कायदेशीर नोटिस

 

वापराच्या अटी

 

हे संकेतस्थळ व त्यामधील अंतर्भूत गोष्टी आपल्याला सर्वसामान्य माहितीच्या उद्देशांसाठी देण्यामध्ये Takedaला आनंद होत आहे. कृपया आमच्या संकेतस्थळाच्या वापराबाबतच्या या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. संकेतस्थळावर समाविष्ट करण्यात आलेली कोणतीही माहिती समाविष्ट करतेवेळी बिनचूक आहे, याची खात्री करण्याचा Takeda सर्वतोपरी प्रयत्न करेल. परंतु, कृपया लक्षात घ्या, की ही माहिती बिनचूक असल्याची हमी Takeda देत नाही आणि या माहितीवर विश्वास ठेवल्यामुळे झालेल्या कोणत्याही हानी किंवा तोट्याची जबाबदारी Takeda स्वीकारत नाही. ही माहिती Takeda केव्हाही, आपल्याला पूर्वसूचित न करता बदलू शकते. हे संकेतस्थळ वापरून आपण या अटी व शर्ती कोणत्याही मर्यादांविना किंवा पूर्वअटींविना मान्य करता.

 

साहित्य आणि बौद्धिक संपदा अधिकारांचा वापर

 

या संकेतस्थळाचा स्वामित्वाधिकार Takedaच्या मालकीचा आहे. इतर सर्व बौद्धिक संपदा अधिकार राखीव आहेत. या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या साहित्याच्या प्रती करण्याचे अधिकार Takeda आपल्याला देते, जर या साहित्याच्या आपण केलेल्या कोणत्याही प्रतींवर सर्व स्वामित्वाधिकार आणि इतर मालकी हक्काच्या नोटिसा तशाच कायम असल्या पाहिजेत, तरच.

 

तृतीय पक्षांच्या संकेतस्थळांच्या लिंक्स

 

संकेतस्थळावर वेळोवेळी तृतीय पक्षांच्या संकेतस्थळांच्या हायपरलिंक्स असू शकतील.’ अशा इतर कोणत्याही संकेतस्थळावर असलेल्या कोणत्याही माहिती किंवा मत याबद्दल Takeda जबाबदार नाही आणि त्यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. कारण अशा संकेतस्थळांवर Takedaचे नियंत्रण नसते आणि त्यांवरील विषयवस्तू Takedaला न कळवता बदलली जाऊ शकते, त्यामुळे त्या संकेतस्थळाच्या वापरकर्त्याची जबाबदारी आहे, की वापरली जात असलेली कोणतीही माहिती बिनचूक आहे आणि संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले कोणतेही सॉफ्टवेअर हे व्हायरस किंवा इतर कोणत्याही विनाशक स्वरुपाच्या गोष्टींपासून मुक्त आहे याची त्याने/तिने खात्री करावी. अशा कोणत्याही डाउनलोड केलेल्या साहित्यामुळे झालेले कोणतेही नुकसान, हानी, खर्च किंवा दायित्व यांची कोणतीही जबाबदारी Takeda स्वीकारत नाही.

 

माहिती हा आरोग्यनिगा तज्ज्ञाच्या सल्ल्याला पर्याय नाही

 

या संकेतस्थळावरील माहिती फक्त आरोग्याशी संबंधित विषयांवरील ज्ञान पुरवण्यासाठी उद्देशित आहे. ही माहिती पूर्ण आहे असे मानू नये आणि ती एखादे डॉक्टर किंवा इतर आरोग्यनिगा तज्ज्ञाची भेट, कॉल, सल्ला किंवा उपदेश यांच्याऐवजी वापरू नये. आरोग्यविषयक समस्यांचे स्वतःच व्यवस्थापन करण्याची शिफारस Takeda करत नाही. आरोग्यनिगेशी संबंधित कोणत्याही प्रश्नांवर त्वरित एखादे डॉक्टर किंवा इतर आरोग्यनिगा तज्ज्ञाशी चर्चा करावी. या संकेतस्थळावरील माहिती वैद्यकीय सल्ल्याची जागा घेत नाही किंवा तिच्यामुळे असा सल्ला घेण्यास विलंब केला जाऊ नये.

 

माहिती बिनचूक, पूर्ण किंवा ताजी असेलच असे नाही

 

या संकेतस्थळावरील पाहिलेली माहिती विस्तृत नाही. जेथे शक्य आहे तेथे बिनचूक आणि ताजी माहिती अंतर्भूत करण्याचे रास्त प्रयत्न Takeda करते, पण तिची अचूकता आणि पूर्णता यांबद्दल कोणतीही हमी देत नाही किंवा दावा करत नाही. ही माहिती “जशी आहे तशी” कोणत्याही स्पष्ट किंवा गृहित हमीविना पुरवली जाते, यामध्ये एखाद्या विशिष्ट उद्देशासाठीच्या योग्यतेबाबतची गृहित हमी अंतर्भूत आहे, परंतु हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. संकेतस्थळाच्या वापराच्या परिणामी होणाऱ्या संगणक हानीसाठी Takeda जबाबदार नाही. Takeda असा कोणताही दावा करत नाही किंवा हमी देत नाही, की संकेतस्थळावरील प्रवेश हवा तेव्हा मिळेल, तो विनाव्यत्यय असेल किंवा त्यात कोणत्याही चुका किंवा त्रुटी नसतील. Takeda कोणतीही हमी देत नाही की ही पाने किंवा ती उपलब्ध करून देणाऱ्या सर्व्हरमध्ये व्हायरस किंवा इतर अपायकारक गोष्टी नाहीत. Takeda, तिच्याशी संबंधित व्यक्ती/संस्था आणि तिच्या उपकंपन्या आणि त्यांचे संबंधित अधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट, प्रतिनिधी, माहिती पुरवठादार आणि त्यांचे परवानेधारक आणि त्या सर्वांचे वारस व नियुक्त व्यक्ती/संस्था या कोणत्याही परिस्थितीमध्ये, जरी नुकसान झाल्याची शक्यता असेल, तरी, कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, तद्जन्य, खास, विशिष्ट, दंडात्मक किंवा इतर नुकसानांसाठी जबाबदार राहणार नाहीत. अधिकारक्षेत्रे गृहित हमींच्या अपवर्जनाला परवानगी देत नाहीत, त्या मर्यादेपर्यंत वरील अपवर्जन हे कदाचित अधिकारक्षेत्रांमध्ये लागू असणार नाही.

 

माहिती

 

या संकेतस्थळावर आलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक संप्रेषणांमधील कोणत्याही व्यक्तिगतरीत्या ओळख सांगणाऱ्या माहितीवर Takedaच्या गोपनीयताविषयक नोटीसची अधिसत्ता असेल’.